उद्देश(स्वच्छता)

वैयक्तिक शौचालय सुविधा व वापर : ग्रामपंचायत अंतर्गत गावात एकुण ३७९ कुटुंब असून प्रत्येक कुटुंचाकडे शौचालय सुविधा आहे. तसेच ग्रा.पं. अंतर्गत शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र, ग्रा.पं. कार्यालय व ईतर शासकीय कार्यालय यांचेकडे शौचालय उपलब्ध असुन हात धुण्यासाटी पाण्याची व्यवस्था आहे. संपूर्ण गावकरी शौचालयाचा वापर करतात. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतापासुन घरगुती व शासकिय कार्यालयातील शौचालय योग्य अंतरावर आणि तांत्रीक दृष्ट्या व पर्यावरण दृष्ट्या योग्य आहे. मागील ५ वर्षात लाल पिवळे कार्ड मिळालेले नाही. टिसीएल सैम्पल तपासणी करिता प्रादेशिक प्रयोग शाळा नागपूर येथे पाठविण्यात येते. टीसीएल व पाणी नमूने दुषीत चा अहवाल प्राप्त नाही. मागील ४ वर्षापासून गोठणगांव येथे कोणताही जलजन्य आजार आढळून आलेला नाही. वेळोवेळी पिण्याच्या पाण्याच्या खोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करूण आवळलेल्या त्रुटींची पुर्तता केली जाते व ग्रा.पं. च्या पाणी पुरवठ्यासंबंधीत नोंदवह्या अद्यावत केल्या जातात.
सांडपपाणी व्यवस्थापन : संपूर्ण गावात नाल्यांची व्यवस्था असून पाणी उताराचे दिशेने गावाबाहेर असलेल्या मोठ्या नाल्यात सोडल्या जाते. गावात प्रत्येक घरी परसबाग असुन पाण्याचा पुर्नवापर परसबागेत केला जातो. कुठेही सांडपाणी रस्त्यावर आलेले दिसत नाही अथवा दुर्गंध येत नाही. नाली व्यवस्थापन/ सांडपाणी व्यवस्थापन व्यवस्थितरित्या केलेले आहे.
घनकचरा व्यवस्थापन : गावात घरोघरी कचराकुंड्या असुन सार्वजनीक ठिकाणी सुद्धा कचराकुंड्या आहेत व त्यांचा नियमीत वापर केल्या जात आहे. ग्रामपंचायत द्वारा आठवड्यातून दोनदा सदर कचरा घंटागाडीद्वारे गोळा केल्या जातो.

ग्रामपंचायत योजना

आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY)
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना
बांधकाम कामगार योजना
संजय गांधी निराधार अनुदान योजना
मुख्यमंत्री सहाय्यता निधी
२मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना (१००% राज्य पुरस्कृत)
प्रधानमंत्री मुद्रा योजना
बांधकाम कामगार योजना
रमाई आवास योजना
महाडिबीटी - शेतकरी योजना (मागेल त्याला..)
मुख्यमंत्री सहाय्यता निधी
प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंद्र
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/ वैयक्तिक घरकुल योजना
रमहाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना (MREGS)
घरेलू कामगारांसाठी कल्याण योजना)
महात्मा फले विकास महामंडळ मागासवर्गीय